महामानव विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त 14 एप्रिल 2026 रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय हिंगोली येथे सलग 10 तास (सकाळी ८ ते संध्याकाळी 6) अभ्यासाचे उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी आपल्या संस्थेतील सर्व डॉक्टर्स ,अधिकारी व कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थी यांनी सदरील उपक्रमामध्ये सहभाग घेऊन प्रज्ञासूर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी प्रत्यक्ष कृतिशील अभ्यासात्मक अभिवादन करावे.
उपक्रमात सहभागी सर्वांना निशुल्क चहा-बिस्कीट, फळे ,ज्यूस ,नाश्ता ,जेवण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय हिंगोली तर्फे दिले जाणार आहे.
सहभागी सर्वांना प्रमाणपत्र सुद्धा दिले जातील.
विद्यार्थ्यानी फक्त अभ्यासाची पुस्तके ,साधने सोबत आणावीत. (मध्यवर्ती ग्रंथालय विभागातील उपलब्ध असलेले पुस्तके उपलब्ध करून देण्यात येतील.)
एप्रिल मे महिना हा परीक्षांचा काळ आहे हे लक्षात घेता विद्यार्थ्यांनी अभ्यासात्मक अभिवादन करून कठोर, दीर्घ अभ्यासाची प्रेरणा या उपक्रमांमधून घ्यावी यासाठी मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवावा, बुद्धिजीवी, पालक यांनी उपक्रमास भेट देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन मा.अधिष्ठाता शा.वै. म.व रुग्णालय हिंगोली, यांनी केले आहे.
Dean
Government Medical College & Hospital,Hingoli.